पुत्र व्हावा ऐसा: Putr Vhava Aisa (Marathi Edition) por सौ. मीनल गावसकर

पुत्र व्हावा ऐसा: Putr Vhava Aisa (Marathi Edition) por सौ. मीनल गावसकर

Titulo del libro: पुत्र व्हावा ऐसा: Putr Vhava Aisa (Marathi Edition)

Autor: सौ. मीनल गावसकर

Número de páginas: 155 páginas

Fecha de lanzamiento: July 5, 2018

Editor: BookHungama (Srujan Dreams Pvt. Ltd.)

Descargue o lea el libro de पुत्र व्हावा ऐसा: Putr Vhava Aisa (Marathi Edition) de सौ. मीनल गावसकर en formato PDF y EPUB. Aquí puedes descargar cualquier libro en formato PDF o Epub gratis. Use el botón disponible en esta página para descargar o leer libros en línea.

सौ. मीनल गावसकर con पुत्र व्हावा ऐसा: Putr Vhava Aisa (Marathi Edition)

"पुत्र व्हावा ऐसा” ह्या पुस्तकामुळे सुनील लहानपणापासून कसा कसा घडत गेला हे बऱ्याच वाचकांच्या ध्यानात आलेच असेल. ह्या घडवण्यात माझा वाटा तसा क्षुल्लकच असून तो घडवून घेण्यात व मुख्य म्हणजे त्याप्रमाणे वागण्यात स्वत: सुनीलचाच वाटा सिंहाचा आहे. सुनील आज जो आपल्यासमोर दिसतो आहे त्याचे सर्व श्रेय त्याला स्वतःला व त्याच्या तपश्चर्येला आहे. एखाद्या ऋषीमुनीप्रमाणे त्याने घोर तपश्चर्या करून आपल्याला क्रिकेट हा खेळामध्ये जे नैपुण्य साध्य करावयाचे होते ते साधले आहे; आणि तरी अजूनही तो शिकतच आहे. ह्या तपचर्ये- मागे त्याचा स्वतःवर असलेला गाढ संयम फार मोलाचा आहे. त्याचा त्याच्या मनावर फार मोठा ताबा आहे व कर्तृत्त्वावर दृढ विश्वास. खरं म्हटलं तर सुनील ही आम्हाला देवाची एक अमूल्य अशीच देणगी आहे. ज्योतिषावर किती विश्वास ठेवावा हे प्रत्येकाच्या विचारांवर व अनुभवावर अवलंबून आहे. आमचा खूप विश्वास आहे व त्याप्रमाणे आम्ही वागत असतो असे नाही. पण अविश्वास मात्र नक्कीच नाही. मला आठवतं सुनील ८- १० वर्षांचा असेल नसेल तेव्हा माझ्या एका नणंदेचे सासरे कै. कानविंदे यांना मी सहज गमतीने सुनीलची जन्मपत्रिका दाखविली होती. व त्यांनी एकाच वाक्यात मला सांगितले होते की ही पत्रिका म्हणजे “देवाची पूर्ण कृपा” असलेली अशी आहे. त्याची प्रचीती आज आम्ही अनुभवतच आहोत. सुनीलने चांगल्या कामगिरीबद्दल जशी वाहवा मिळवली त्याच्यापेक्षा कदाचित थोडी जास्तीच कठोर व अनाठायी टीकाही सहन केली आहे. वाहवा व टीका दोन्हीही समतोलपणे पेलवून घेण्यास मन फार खंबीर असावं लागतं आणि ह्या कणखरपाणामुळेच तो आपली पुढील वाटचाल सुकर व यशस्वी करू शकला. ज्या लहान मुलांना आज आदर्श म्हणून सुनील ठेवायचा असेल तर त्यांनी फक्त सुनीलचे रेकॉर्डस् डोळ्यांपुढे न ठेवता त्याच्या इतर सर्व गुणांचीही आपल्यावर छाप पाडून घ्यावयास हवी. सुनील आमचा मुलगा असणे ही एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण म्हणून सुनीलने दिग्विजय केल्यावर आम्ही हुरळून जात नाही. आमच्या भावना आमच्या चेहऱ्यावरून कोणी समजू शकणार नाही. पण त्या वेळी माझ्या डोळ्यांत कोणी डोकावून पाहिले तर.. .तर त्यांना त्या पाणावलेल्या डोळ्यांत सुनीलचा जणू चलत् चित्रपट दिसेल. आणि हीच आमची आनंदाची प्रतिक्रिया.
- सौ. मीनल मनोहर गावसकर